विहाना एज्युकेशनल ट्रस्टच्या ज्ञानसेवा स्कॉलर अकॅडमीतर्फे आयोजन
सावंतवाडी : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी करता यावी आणि परीक्षेचा सराव व्हावा, या उद्देशाने विहाना एज्युकेशनल ट्रस्ट, सिंधुदुर्ग संचलित ज्ञानसेवा स्कॉलर अकॅडमी, सावंतवाडी यांच्या वतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही परीक्षा रविवार, २९ नोव्हेंबर रोजी स्टेपिंग स्टोन हायस्कूल, कोलगाव येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून मराठी, सेमी इंग्रजी आणि सीबीएसई माध्यमातील विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचा सराव, परीक्षेचे स्वरूप समजून घेणे आणि परीक्षेची पूर्वतयारी करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी अभय जाधव सर (९३०९२२५२३५) यांच्याशी संपर्क साधावा.













