परुळे : प्रतिनिधी : भोगवे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रमेश सावळाराम गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भोगवे ग्रा. पं. ती ची सर्वसाधारण ग्रामसभा नुकतीच किल्लेनिवती शाळा येथे संपन्न झाली. यावेळी सरपंच अंकिता वायंगणकर, उपसरपंच रुपेश मुंडये, ग्रायं. सदस्य मिलिंद सामंत, सखाराम केसरकर, मनाली गायकवाड़, दिगंबर केसरकर, यांसह चेअरमन आदीमारायण सोसायटी चेतन सामंत, रविंद्र कासवकर रामकृष्ण पाटकर, प्रतिक्षा मुंडये अनील सामंत, तुषार सामंत आरोग्य सेवक सूर्यकांत मठकर, आरोग्य सेविका एस एस आरोलकर, कोतवाल चंद्रकांत गोसावी यांजबरोबर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ
उपस्थित होते. ग्रामसेवक मंगेश माईक यांनी कामकाज
पाहीले यावेळी ग्रामसभेच्या विषयानुसार चर्चा करण्यात
आली. तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली याबद्दल रमेश गावडे यांचे सर्वानी अभिनंदन केले.












