वेंगुर्ला : दिवाळी ‘शो टाइम’ २०२६ च्या औचित्याने श्री देव नाईक वस मित्र मंडळ, रेडी गावतळेवाडी आणि नवजीवन ब्लड सेंटर, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गावठळेवाडी प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिराचे हे पाचवे वर्ष असून, रक्तदान हेच जीवनदान या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गरजू रुग्णांना रक्ताची मदत मिळावी आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.तरी परिसरातील सर्व रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन श्री देव नाईक वस मित्र मंडळ, रेडी गावतळेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.













