प्रतिभा बागवे यांचे निधन 

मसुरे | प्रतिनिधी

 

मसुरे गडघेरावाडी येथील रहिवासी प्रतिभा भिकाजी बागवे ( 84 वर्षे)

यांचे गुरुवारी संध्याकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. शुक्रवारी दुपारी मसुरे गडघेरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिभा बागवे या माई या टोपण नावाने मसुरे गावांमध्ये प्रसिद्ध होत्या. सर्वांशी आपुलकीने आणि हसत खेळत राहण्याचा मनमिळाऊ असा त्यांचा स्वभाव होता.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा त्यांचा मोठा परिवार असून

मसुरे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बागवे,

प्रकाश बागवे, विकास बागवे यांच्या त्या मातोश्री तर मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे सचिव प्रसाद बागवे यांच्या त्या काकी होत.