सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पुरस्कृत गणेशचतुर्थी निमित्ताने घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन

जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी हसभगी होण्याचे केले आवाहन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पुरस्कृत आणि प्रत्येक तालुकानिहाय काँग्रेस कमिटी आयोजि गणेशचतुर्थी निमित्ताने घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रायोजित केली असून प्रत्येक तालुक्यात होणार आहे.यासाठी त्या त्या तालुक्यातील तालुकाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयातून शुक्रवार दि. २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
आपल्या गणेशाच्या विसर्जनाच्या कमीत कमी एक दिवस अगोदर पर्यंत आपला व्हिडीओ पाठवणे अनिवार्य आहे, त्या नंतर आलेला व्हिडीओ स्पर्धेसाठी विचारात घेतला जाणार नाही.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपतीच्या बाजूला केलेल्या सजावटीचे, चलचित्राचे एक मिनिटांचा व्हिडीओ बनवून आम्हाला वॉटसअप द्वारे पाठवायचा आहे.,सोबत स्पर्धकांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवायचा आहे. ही स्पर्धा जिल्ह्यात आठही तालुक्यात घेण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन अशी जिल्ह्यात एकूण चाळीस पारितोषिके दिली जातील.परिक्षक स्पर्धेचे व्हिडीओ पाहून आवश्यकता वाटल्यास आपल्या घरी येऊन परिक्षण करतील व त्याबाबतचा निकाल जिल्हा काँग्रेस कार्यालयात सादर करतील.
प्रथम पारितोषिक ११,१११/-
द्वितीय पारितोषिक ७७७७/-
तृतीय पारितोषिक ५५५५/-
उत्तेजनार्थ एकूण दोन पारितोषिक प्रत्येकी ११११/-
व प्रमाणपत्र
अशी प्रत्येक तालुक्यातील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील.अशी माहिती तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी दिली आहे.
तालुकानिहाय समन्वयक-
विधाता सावंत – वेंगुर्ला
(9579422631)
मेघनाद धुरी- मालवण
(9422096765)
अभय शिरसाठ – कुडाळ
(7350133444)
प्रदीप मांजरेकर – कणकवली
(94224336880)
वसंत नाटेकर – वैभववाडी
(8805768570)
रविंद्र म्हापसेकर- सावंतवाडी
(9422055227)
वासुदेव नाईक – दोडामार्ग
( 9403351151 )
उमेश कुलकर्णी – देवगड
(9821936472)व अधिक माहितीसाठी जिल्हा स्पर्धा मुख्य समन्वयक
अरविंद मोंडकर 9892055820
यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख
यांनी केले आहे.