रत्नागिरी | प्रतिनिधी : भारत शिक्षण मंडळ रत्नागिरी आयोजित अच्युतराव पटवर्धन स्मृती वक्ता दशसहस्त्रेशु जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2023 आयोजन रविवार 1 ऑक्टोबर २० २३ रोजी रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे सकाळी दहा वाजता करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यालयांचा यात सहभाग असावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं असून चार गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.आहेत
गट 1 इयत्ता 6 ते 8 यांच्यासाठी ‘देश माझा,मी देशाचा’ व ‘माझे आदर्श’ असे दोन विषय देण्यात आले आहेत. प्रत्येक स्पर्धकाला सात मिनिटे इतकी वेळ देण्यात आली आहे. गट 2: 9 ते 12 या गटासाठी ‘इंटरनेट दूरचे जवळ की जवळचे दूर’ व ‘कोकणचे पर्यटन भास की आभास’ असे दोन विषय देण्यात आले असून प्रत्येक स्पर्धकाला नऊ मिनिटे बोलण्यास वेळ देण्यात आला आहे. तिसरा गट वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असून त्यांच्यासाठी ‘भारताची चांद्रयान मोहीम – भविष्यातील वेध’ व ‘गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी’ असे दोन विषय देण्यात आले असून बोलण्यास दहा मिनिटे इतका वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात आला आहे. चौथा गट शिक्षक गट असून त्यांच्यासाठी ‘स्वातंत्र्य – हक्क की जबाबदारी’ व ‘नवीन शैक्षणिक धोरण- स्वरूप संधी आणि आव्हाने’ असे दोन विषय देण्यात आले असून स्पर्धकाला बोलण्यास दहा मिनिटे देण्यात आले आहेत.
गट 1 आणि 2 साठी पहिल्या क्रमांकाला प्रत्येकी रु. 1001, द्वितीय क्रमांकाला प्रत्येकी रू 750, तृतीय क्रमांकाला रू 500 तसेच उत्तेजनार्थ दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. गट तीन साठी प्रथम क्रमांकाला रू. पंधराशे, द्वितीय क्रमांकाला रू. बाराशे, तृतीय क्रमांकाला रू. एक हजार रुपये तर चौथ्या गटासाठी प्रथम क्रमांकाला रु. 2000, द्वितीय क्रमांकाला रू. 1500 आणि तृतीय क्रमांकाला रू. एक हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश नोंदवण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2023 असून या स्पर्धेत शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सहभागी व्हावं असा आवाहन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी कार्याध्यक्ष सौ. नमिता किर, कार्यवाह सुनील वणजू यांनी केला आहे.











