मोडकाआगर | वार्ताहर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित तालुकास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धा सन २०२३ -२४, न्यु इंग्लिश हायस्कूल पाटपन्हाळे येथे पार पडली. त्या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुले या गटामध्ये गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आर जी पी पी एल कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलचे विद्यार्थी कु. आर्यन कोलवणकर – प्रथम, कु. आर सात्विक – द्वितीय, कु.आदन अडोनोल – तुतीय व कु. प्रथम गजभिये पाचवे स्थान तर १४ वर्षाखालील मुली या गटामध्ये बाल भारती पब्लिक स्कूल,अंजनवेलच्या विद्यार्थीनी कु. विदिता पांड्ये – चौथ्ये व कु. आवरिता भारद्वाज – पाचवे स्थान पटकावून शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत जाण्याचा मान मिळवला. तर १७ वर्षाखालील मुले कु. अर्णव तोडकरी- प्रथम, कु. शिवराज दाभोळकर – तिसरे , कु. वरद फुणगुस्कर- चौथ्ये व कु. आर्यन चव्हाण – पाचवे स्थान तर १७ वर्षाखालील मुली या गटामध्ये बाल भारती पब्लिक स्कूल,अंजनवेलच्या विद्यार्थीनी कु. तनया खानविलकर – प्रथम व कु. आयेशा खतीब – तिसरे स्थान पटकावून शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत जाण्याचा मान मिळवला. या स्कूलच्या संघाचीही शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली. या संघांना श्री. नविंदर लखनपाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित च̆टर्जी सर,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी याच्या समवेत प्राचार्यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या शालेय विभागीय स्पर्धेत घवघवीत यश मिळावे यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.












