चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय,चिपळूण येथे मंगळागौर उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला गेला. श्रावण म्हटला की सणांची लय लूट सुरू असते. श्रावणाला सणांचा राजा म्हटले जाते. प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय,चिपळूण येथे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.श्रावण महिन्यातील हा मंगळागौर उत्सव शाळेत साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता नाईक मॅडम यांनी मंगळागौरीचे पूजन केले.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ यांतील महिला पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे छोट्या छोट्या विद्यार्थिनींनी सादर केलेले बहारदार मंगळागौरीचे कार्यक्रम. या कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला.शाळेतील शिक्षिकांनी सुध्दा यात आपला पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमाला तर सर्वांचीच दाद मिळाली.यावेळी मंगळागौरीचे विविध खेळ अत्यंत उत्साहात खेळले गेले..काही खेळ आजच्या आधुनिकतेच्या काळात मागे पडत चाललेले आहेत.परंतु शाळेच्या माध्यमातून या सर्व खेळांची,आपल्या संस्कृती, परंपरा यांची माहिती विद्यार्थ्यांना करुन देणे हे कार्य शाळा नेहमीच करत असते.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता नाईक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.शर्मिला मोडक मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.












