वाफोलीत दुचाकी घसरुन गोव्यातील महिला गंभीर जखमी

वाफोलीत दुचाकी घसरुन गोव्यातील महिला गंभीर जखमी

बांदा (प्रतिनिधी) :

वाफोली धरणाजवळ पूलावरील खड्ड्यात दुचाकी पडून पेडणेतील महिला गंभीर जखमी झाली. सना दरेकर (४५) असे तीचे नाव आहे. आहे. स्थानिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार करुन महिलेला अधिक उपचारासाठी बांबुळीत हलविण्यात आले आहे.
बांदा – दाणोली मार्गावर वाफोली नळपाणीपुरवठा टाकीजवळ मोठा खड्डा पडला आहे. बांद्याच्या दिशेने येताना उतारावर हा खड्डा वाहनचालकांच्या नजरेस पडत नाही. ऐनवेळी ब्रेक लावल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी झालेत. स्थानिक प्रशासनाने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खड्डे बुजविण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने अपघातात वाढ झाली आहे.
———–