ओटवणे | प्रतिनीधी : ओटवणे गावच्या पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गा वविकास पॅनेलचे आत्माराम ऊर्फ दाजी गावकर तर उपसरपंच पदी माजी सरपंच संतोष कासकर यांची निवड झाली. १८डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीत गावविकास पॅनेलचे ४तर शिंदे गटाचे ५उमेदवार निवडून आले होते आज शुक्रवारी पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शिंदे गटातून पाच अर्ज तर गाव विकास चा एकच अर्ज भरण्यात आला होता शिंदे गटाच्या उमेदवारास ५तर गावविकास पॅनलच्या उमेदवारास ५मते मिळाल्यानंर सरपंचांच्या निर्णायक मताने गाव विकास पनेलचे संतोश कासकर हे उपसरपंच पदी निवडून आले. गाव विकास पॅनलने रवींद्र म्हापसेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली होती मात्र म्हापसेकर यांचा थोडक्यात झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून गड आला पण सिंह गेला अशी कार्यकर्त्यांची अवस्था झाली होती.
मात्र असे असले तरी रवींद्र म्हापसेकर यांच्या विचारांचा सरपंच निवडून आणण्यास म्हापसेकर आणि कार्यकर्त्यांना यश आल्याने कार्यकर्त्यांमधे उत्साहाचे वातावरण होते. नवनिर्वाचित सरपंच दाजी गावकर यांनीही रवींद्र म्हापसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगीतले. सदस्य पदी प्रशांत बुराण, लावण्या तावडे ,संजना जाधव या विजयी सदस्यां सह सरपंच, उपसरपंच यांचे स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या. निवडणूक निरीक्षक म्हणून शैलेश परब तर निवडणूक नामदेव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली . तांबे यांनी व्यवस्थित निवडणूक पार पाडत नियोजन बद्द काम करीत शांततेत निवडणूक पार पाडली