भुईबावडा | प्रतिनिधी : भुईबावडा गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी राजेंद्र सिताराम मोरे उर्फ बाळू पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या निवडीबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे शांत संयमी व्यक्तिमत्त्वाची योग्य ठिकाणी निवड झाल्याबाबत सरपंच बाजीराव मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच बाजीराव मोरे ग्रामपंचायत सदस्य श्रेया मोरे अकोबा मोरे तानाजी मोरे मनोहर मोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते माझी सभापती भालचंद्र साठे यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले भुईबावडा गाव हा शांततेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो गावात यापुढे देखील कायदा व सुव्यवस्था राखून तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून योग्य तो न्याय दिला जाईल असे मत नूतन अध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले









