दोडामार्ग | प्रतिनीधी : तालुका शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी संबंधीतांना दिल्या आहेत
सन 2023 यावर्षी अनंत चतुर्दशी व ईद ए मिलाद हे सण एकाच दिवशी आलेले असल्याने धार्मिक सलोखा कायम राखला जाईल, व दोन्ही सण शांततेत पार पडतील याबाबत योग्य त्या सूचना दिल्याअसून तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले
त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात वाहतूक नियोजन कसे करावे, पार्किंग व्यवस्था, मिरवणुकांचे मार्ग, ध्वनी मर्यादा, याबाबत सविस्तर चर्चा करून उत्सव काळात निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
सदर बैठकीला दोडामार्ग पोलीस निरीक्षक श्री. पवार, सहायक पो.नि.जयेश ठाकूर तसेच शांतता कमिटीचे इसाक खेडेकर, मायकल लोबो, सौ ललिता भोळे, . संजय गवस, सेजल बांदेकर आदीं सदस्य उपस्थित होते.











