वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ला नवाबाग येथे गाव उभादांडा हॉलीक्रॉस पारंपरिक रापण संघ यांची मासेमारी करताना जाळी फाटली होती आणि या पारंपारिक मच्छीमारांवर संकट ओढवल होतं. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री दीपक केसरकर यांनी त्यांना तात्काळ आर्थिक स्वरूपात मदत केली आहे.
आज तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम तसेच सुनिल मोरजकर, कार्मिस आलमेडा व रापण व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.












