वेंगुर्ले येथे गोवा बनावटी दारू वाहतूकीवर कारवाई : सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त
वेंगुर्ले : प्रतिनिधी
गोवा येथून वेंगुर्ले च्या दिशेने दुचाकी गाडीने गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा ऑलविन अंतोन फर्नांडिस वय ३९ वर्षे राहणार पेडणे गोवा याला पोलिसांनी दारूच्या बाटल्या, गाडी असा एकूण एक लाख रुपयांच्या मुद्देमाला सह आज ताब्यात घेतले.
वेंगुर्ले शिरोडा मार्गावर सकाळी पोलीस पेट्रोलिंग चालू असताना जांभळ्या रंगाची जुपिटर जी ए ११ एफ ९५४९ घेऊन येणाऱ्या ऑलविन फर्नांडिस याला पोलिसांनी थांबविले आणि गाडीत तपासणी केली असता त्याच्या जवळ गोवा बनावटीची दारू आढळून आली. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन गाडीसह एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर यांनी कारवाई केली आहे.











