नगरसेवक सुभाष सापटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंडणगड तालुका अध्यक्षपदी निवड

मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड नगरपंचायतीचे नगरसेवक सुभाष महादेव सापटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंडणगड तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. पार्टीचे मुंबई येथील प्रदेश कार्यकारिणीचे कार्यक्रमात याबद्दलची घोषणा करण्यात आली व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण, उपाध्यक्ष फैरोज उकये, दिनेश हुंबरे, मूबीन परकार, धीरज कदम, हसरत खोपटकर यांच्यासह राज्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ध्येय धोरण तळागाळात पोहचवण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या निमीत्ताने केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थापनेपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले श्री. सुभाष सापटे यांनी पार्टीचे जनरल सक्रेटरी या पदावर वीस वर्षाहुन अधिक काळा प्रामाणीकपणे काम केले आहे त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊनच प्रदेश कार्यकारिणीने त्यांना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व करण्याची संघी दिली आहे. निवडीबद्दल श्री. सापटे यांचे तालुक्यातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.