सामान्य कार्यकर्ता हा खासदार शरद पवार, यांच्या पाठीशीच, तालुक्याचे विकासाचे प्रश्नाकरिता संघर्षाची भुमीका घेणार

राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण यांची पत्रकार परिषद.

मंडणगड l प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झालेले प्रकाश शिगवण व मंडणगड तालुक्याचे अध्यक्षपदी निवड झालेले नगर सेवक सुभाष सापटे यांचा पार्टीचे शिगवण कॉम्पलेक्स येथे दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या निमीत्ताने आयोजीत पत्रकार परिषदेस जिल्हा उपाध्यक्ष फैरोज उकये, उपाध्यक्ष अरुण घोसाळकर, राजेंद्र गायकवाड, सुरेश कदम, हसरत खोपटकर, भावेश लाखण, धीरज कदम, राहूल कोकाटे, दिनेश हुंबरे, यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश शिगवण यांनी पार्टीची भुमीका व आगामी काळातील वाटचाल स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की राज्यातील सत्तातरांचे जिल्ह्यातील राजकारणावर मोठे परिणाम झाले असे असले तरी तळागाळातील कार्यकर्ता हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात मुळ पक्ष जनहिताच्या प्रश्नावर वाटचाल कऱणार आहे. तालुक्याचे प्रश्न व येथील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची भुमीका घेतली आहे. येथील रस्ते पुल व बेरोजगाराचे प्रश्नावर संघर्ष करणार असल्याचे यावेळी श्री. शिगवण यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर पोलीसांकडून झालेल्या लाठी हल्याचा यावेळी जाहीर निषेध व्यक्त करताना या संदर्भात जिल्हाभर आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

महविकास आघाडीने विकासकामांचे माध्यमातून तालुक्याला न्याय दिला असून आगामी काळातही दोन तालुक्यातील जनतेला न्याय मिळावा असा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही जिल्हा कार्याध्यक्ष श्री. शिगवण यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष सापटे यांनी आपली भुमीका मांडताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून तालुका सरचिटणीस पदाचा दीर्घकाळाचा अनुभव लक्षात घेऊन नेतृत्वाने विश्वास ठेवुन तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. पक्षाटी ध्येय धोरणे तळागळात पोहचवण्यासाठी अग्रक्रम राहणार आहे. खासदार शरद पवार यांनी तालुक्याची प्रत्येक संकटाच्या घडीला तालुक्याची मदत केल्याने येथील सर्वसमान्य कार्यकर्ता शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यामुळे तालुक्यात क्रमांक एक चा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदयास आलेली दिसेल. स्वार्थासाठी वेगळा विचार मांडणाऱ्यांना राष्ट्रवादीचा मुळ विचार मानणारे कार्यकर्ते अजिबात स्विकारणार नसल्याची यावेळी स्पष्ट केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष फैरोज उकये व तालुका उपाध्यक्ष अरुण घोसाळकर यांनीही भुमीका मांडली. कार्यक्रमाचे औचीत्यसाधून उपाध्यक्षपदी निवड झालेले अरुण घोसाळकर व राजेंद्र गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.