जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करताना मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकीरण पूजार यांनी दिली माहिती
रत्नागिरी | प्रतिनिधी : जिल्हा परिषद रत्नागिरी, शिक्षण विभाग (प्राथमिक) निवड करणेत आलेल्या शिक्षक पुरस्काराची मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी घोषणा केली. मात्र यंदा जिल्हास्तरीय विशेष पुरस्कारासाठी एकही योग्य प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी दिलेल्या माहितीनुसार
मंडणगड – श्री. सुनिल सिताराम आईनकर, (पदवीधर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शेनाळे)
दापोली – श्री. जयंत जनार्दन सुर्वे (उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाजपंढरी)
खेड – श्री. सुधाकर राजाराम पाष्टे (पदवीधर, जिल्हा परिषद शाळा ऐनवरे)
चिपळूण – श्री. पांडुरंग शांताराम कदम (पदवीधर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मालघर नं. १)
गुहागर – श्री. दशरथ रघुनाथ साळवी (उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा काजुली नं.१)
संगमेश्वर – श्री. उमेश पांडुरंग डावरे (उपशिक्षक, जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा साखरपा नं. १)
रत्नागिरी – श्रीम. विशाखा विष्णु पवार (पदवीधर, कुवारबाव उत्कर्ष नगर)
लांजा – श्रीम. संजना संतोष वारंग (पदवीधर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माजळ)
राजापूर – श्री. सुभाष भाऊ चोपडे (उपशिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करक नं. १)
जिल्ह्यातून आलेल्या 30 प्रस्तावातून या 9 शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.











