मसुरे | झुंजार पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने
प्रा. मधु दडवते जन्मशताब्दी शुभारंभानिमित्त
देण्यात येणारा
बापूभाई शिरोडकर स्मृति
आदर्श समाज सेवक पुरस्कार
माझे आजोळ
या वृद्धाश्रमाचे प्रमुख
भरत रमेश भोगटे
याना जाहीर झाला आहे
भरत भोगटे हे मूळ मसुरे गावचे असून
मुंबईतील जुन्या पिढीतील काँग्रेसचे नेते रमेश भोगटे यांचे सुपुत्र आहेत.
बँक ऑफ इंडियात नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यावर
त्यानी आपली पत्नी व मुलगी
यांच्या स्मृति प्रित्यर्थ
तिरवडे येथे
वृद्धांसाठी सहजविन प्रकल्प सुरु केला.
वैयक्तिक जीवनात त्याना अनेक संकटांचा सामना करावा लागला. एकुलत्या एक मुलीचे व पत्नीचे निधन झाले. या दुःखाचा एकटेपणाचा कटू अनुभव गाठीशी बांधीत भरत भोगटे यानी दुसऱ्याच्या आनंदातून आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. अन् त्यातून साकारले माझे आजोळ. कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता एक अभिनव प्रकल्प साकारला गेला.
त्याकामी त्यांचे बंधू किशोर भिसे
यानी तिरवडे येथील एक एकर जागा
विनामूल्य दिली. त्यांचे प्रमुख सहकारी विजय पोतदार यांचे मोलाचे सहकार्य त्याना लाभले.
या ज्येष्ठ बांधवाच्या आनंदात
भरत भोगटे आपला आनंद मानतात.
त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी
हा पुरस्कार त्याना प्रदान करण्यात येणार आहे.
या अगोदर
डॉ दादासाहेब वराडकर,
कॅप्टन रामकृष्ण गावडे,
डॉ. संजय खोत,
जेजे च्या डिन पल्लवी सापळे याना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. २१ जानेवारी रोजी
दुपारी ३ वाजता
प्रा मधु दंडवते यांच्या
जन्म शताब्दी शुभारंभा दिवशी मान्यवरांचे उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे आवाहन निवड समिती व कट्टा सेवांगणच्या वतीने
किशोर शिरोडकर, विकास म्हाडगुत, श्याम पावसकर, बापू तळवडेकर यानी केले आहे.