मसुरे | झुंजार पेडणेकर :
“केंद्रशाळा मसुरे नं.१च्या यशामध्ये विनोद कदम यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी आपल्यातील कला व क्रीडा नैपुण्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी केलेले मार्गदर्शन निश्चितच कौतुकास्पद आहे. यापुढेही त्यांच्या हातून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन नक्कीच मिळेल असे उद्गार विनोद कदम यांना शुभेच्छा देताना विविध मान्यवरांनी काढले.
मसुरे नं.१ या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. विनोद कदम यांचे प्रशासकीय बदली झाल्याने त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या वतीने शाल श्रीफळ सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
“केंद्रशाळेतील विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी चमकले. त्यांच्या यशातूनच आम्हालाही सन्मान मिळाला, येथील ग्रामस्थांनीही वेळोवेळी उत्तम सहकार्य केलं, हे आमचं भाग्यच आहे,” असे उद्गार सत्काराला उत्तर देताना श्री कदम सर यांनी काढले. शालेय विद्यार्थ्यांना संगीताची आवड निर्माण व्हावी आणि विविध उपक्रमात उपयोग व्हावा म्हणून शाळेसाठी ढोलकी व संगीत वाद्य भेट म्हणून त्यांनी दिले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, माजी सरपंच सौ. लक्ष्मी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. भोगले,
मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, सौ. शीतल मसुरकर, दत्तप्रसाद पेडणेकर, सचिन कातवणकर, गोपाळ गावडे, गुरुनाथ ताम्हणकर, रामेश्वरी मगर, विनोद सातार्डेकर, हेमलता दुखंडे ग्रामस्थ पालक व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.