रिपाई ( ए ) पक्षातर्फे मराठा आंदोलकांवर शासनाने केलेल्या लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध , मंडणगड तहसीलदार यांना निवेदन

मंडणगड  ( प्रतिनिधी ) जालना येथील सनदशीर मार्गाने सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन दडपनेच्या हेतूने अमानुषपणे लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा व राज्य शासनाचा जाहीर निषेध व तपास होणे बाबत.
कोलाड, जिल्हा रायगड येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता चंद्रकांत कांबळे यांच्या करण्यात आलेल्या हत्येचा जाहीर निषेध व चौकशी होऊन दोषींवर कारवाई होण्याबाबत . हरेगाव ता. श्रीरामपूर जि.अहमदनगर येथील दलित समाजातील तरुणांवर अमानुषपणे मारहाण करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध व संबंधितांवर कारवाई होणे बाबत. पानवन ता. माण जि. सातारा येथील महिलेला गावगुंडांकडून करण्यात आलेल्या अमानुषपणे मारहाणीचा जाहीर निषेध व संबंधित दोषींवर कडक कारवाई होणेबाबत. रिपाई ( ए ) पक्षातर्फे मराठा आंदोलकांवर शासनाने केलेल्या लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध करीत आज मंडणगड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी रिपाई ( ए ) पक्षातर्फे सामाजिक कार्यकर्ते , रिपाईचे माजी तालुकाध्यक्ष व बौद्ध समाज सेवा संघ , मंडणगड तालुक्याचे अध्यक्ष श्री. राजेश गमरे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मंडणगड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना देण्यात आले आहे.

देशात ,राज्यात ठिकठिकाणी जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा शंका निर्माण होत असून विषय सूचीतील घटनांमुळे त्यास दुजोरा मिळत आहे प्रशासन व राज्य शासन कायदा सुव्यवस्था राखण्यास कुचकामी ठरत आहे. जाणीवपूर्वक अशा घटनांवर व दोषींवर कारवाई न करून त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे अशी जनमानसात शंका व्यक्त केली जात आहे.सदर मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात घडत आहेत. तसेच सनदशीर मार्गाने मराठा आरक्षण या आपल्या मागण्यांसाठी करण्यात आलेले आंदोलन दडपण्याचे कुटील कारस्थान थांबवण्यात यावे अशा मनोवृत्तीचा व प्रवृत्तीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) तालुका मंडणगड च्या वतीने जाहीर निषेध करीत असून संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा गर्भित इशारा शासनाला या निवेदना मार्फत देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति मा. एकनाथ शिंदे सो , मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य , मंत्रालय मुंबई ., मा. देवेंद्र फडणवीस सो, उपमुख्यमंत्री / गृहमंत्री महाराष्ट्र राज्य , मंत्रालय मुंबई, मा. विजय वडेट्टीवार सो, विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य , मंत्रालय मुंबई ., मा. जिल्हा पोलीस अधीक्षक सो, जि. रत्नागिरी , जि.पो.अ. कार्यालय जेल रोड रत्नागिरी, मा. तहसीलदार सो, मंडणगड , तहसील कार्यालय मंडणगड, मा. पोलीस निरीक्षक सो, मंडणगड पोलीस ठाणे मंडणगड , यांना देण्यात आल्या आहेत.

यावेळी आर पी आय चे आयु. राजेश पांडुरंग गमरे ( माजी तालुका अध्यक्ष), आयु. राजेश राजाराम साळवी ( तालुका अध्यक्ष ) , आयु राजेश बाबुराव खैरे (युवा कार्यकर्ता ), आयु . गणेश मोहन जाधव (तालुका संघटक), आयु.बाळाराम सखाराम येलवे (जेष्ठ कार्यकर्ता ), आयु. महेंद्र रणजीत यादव (जि.का. सदस्य ), आयु मनोहर महादेव जाधव ( जेष्ठ कार्यकर्ता ), आयु. जनार्दन तुकाराम कांबळे ( जेष्ठ कार्यकर्ता), आयु. बबन रतन जाधव ( जेष्ठ कार्यकर्ते ), आयु. सागर हिरामण खैरे (युवा कार्यकर्ते ), आयु. सौरभ सदानंद खैरे (युवा कार्यकर्ते ) इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.