मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड ता.विकास मंडळ,F-1428 संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाय.व कनिष्ठ महाविद्यालय,मंडणगड येथे 5 सप्टेंबर 2023 हा दिवस शिक्षकदिन म्हणून उत्साहाने साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक शिक्षक-शिक्षिका तसेच शिपाई म्हणून आज रोजी काम पाहिले.प्राचार्या-कु.श्रेया मनवे, उपप्राचार्य -विक्रांत भगत,लिपिक-कु.रुपाली कुलापकर, शिपाई -इब्राहिम वाडकर आणि शिक्षक-शिक्षिका म्हणून सर्व वर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आपली भूमिका बजावली.
या सर्वांना मार्गदर्शन श्री याचावाड सर,श्री.देवघरकर सर,सौ.आटपाडकर मॅडम आणि संबंधित वर्गाचे वर्गशिक्षक यांनी केले.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर हा दिवस पूर्ण भारतामध्ये शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.ते एक थोर शिक्षणतज्ज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. वेळेच्या पुढच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे आपले अनुभव कार्यक्रमात सांगितले.सुत्रसंचालन,स्वागत,भाषणे,आभारप्रदर्शन विद्यार्थीवर्गाने आयोजित केले.
कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य श्री खाडे सर, उपप्राचार्य श्री हुल्लोळी सर,शिक्षक प्रतिनिधी श्री बिराजदार सर यांनी सर्व विद्यार्थीवर्गाचे कौतुक केले. सर्व कार्यक्रमाची फोटोग्राफी श्री. भालके सर यांनी केली.











