शिरगाव-शेवरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे संतोषकुमार फाटक यांची बिनविरोध निवड

शिरगांव (वार्ताहर)   देवगड तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत शिरगाव शेवरे च्या उपसरपंचपदी भाजपाचे संतोषकुमार फाटक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव-शेवरेचे उपसरपंच अमित साटम यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी मंगळवारी ग्राम सचिवालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपसरपंचपदासाठी संतोषकुमार फाटक हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

नवनिर्वाचित उपसरपंच संतोषकुमार फाटक यांचे भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, सोसायटी चेअरमन मंगेश लोके, संचालक संतोष तावडे, पोलिस पाटील चंद्रशेखर साटम, माजी पंचायत समिती सदस्या सौ. अपूर्वा तावडे, माजी सरपंच संजय रुपये, रिक्षा चालक-मालक संघाचे संतोष जंगले, सदाशिव चव्हाण, विनोद आईर, महेश चौकेकर, शैलेंद्र जाधव, पांडुरंग घाडी, विनोद सरफरे, हडपिडचे उपसरपंच दाजी राणे, बंडू माने, मंगेश फाटक, अनिल फाटक, सूर्यकांत फाटक, परशुराम फाटक, बापू फाटक, हेमंत फाटक, शरदचंद्र फाटक, बाबी फाटक, गुरुनाथ फाटक, गगन फाटक आदींनी अभिनंदन केले.

यावेळी सरपंच समीर शिरगावकर, ग्रामपंचायत सदस्य अमित साटम, राजेंद्र शेट्ये, मंगेश धोपटे, स्वाती साटम, वैष्णवी आईर , शीतल तावडे, प्रेरणा कुबडे, स्नेहा मेस्त्री, मयूरी चौकेकर, ग्रामविकास अधिकारी दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच संतोषकुमार फाटक म्हणाले की, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्या पर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करीन. तसेच राजकारण विरहित लोकाभिमुख ग्रामविकास करून आपण माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावीन.