शिरगाव( वार्ताहर) कोळोशी- हडपीड हायस्कूल येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरिय कबडीस्पर्धॅत शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सुयश संपादन केले. शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्याचा १९ वर्षाखालील कबड्डी संघ मुलींच्या गटात कबड्डी स्पर्धेत विजेता ठरला.तसेच १९ वर्षाखालील कबड्डी संघ मुलगेच्या गटात कबड्डी स्पर्धेत उपविजेता ठरला.
या स्पर्धेतील मुलींच्या विजेत्या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या त्यांच्या यशाबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले,संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक,प्राचार्य एस.एन.अत्तार, पर्यवेक्षक उदयसिंह रावराणे,सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.









