राजापूर (वार्ताहर): शहरानजीकच्या आंबेवाडी येथे गोकुळअष्टमी व दहिकाला उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी वायुपुत्र गोविंदा पथकांनी दहिहंडी फोडत उत्सवाचा आनंद लुटला.
आंबेवाडी येथील प्रतिष्ठीत नागरिक प्रभाकर रावण यांच्या निवासस्थानी परंपरेने गोकुळ पूजन करण्यात आले. यानिमित्त दिवटेवाडी भजन मंडळाचे भजन तसेच स्थानिक मंडळाचे भजन, जागर असा अष्टमीचा उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.
तर दहिकाला उत्सवा दिवशी गावात वेगवेगळया ठिकाणी दहीहंडी बांधण्यात आल्या. त्या वायुपुत्र गोविंदा पथकाने फोडत उत्सवाचा आनंद लुटला. तर जवाहरचौक येथे झालेल्या दहीहंडी उत्सवात सहभाग होत पाच थराचा मानवी मनोरा रचत रसिकांची मने जिंकली.
आंबेवाडी येथील प्रभाकर रावण, रमाकांत गार्डी, मंगेश रावण, विजय बोळे, अनंत जडयार, महिपत भारती, अनंत नाडणकर, प्रकाश बंडबे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्स्व साजरा करण्यात आला.











