दापोली : टाळसुरे-तेलीवाडी येथील पती-पत्नीवर कोयतीने वार

रत्नागिरी ः प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील टाळसुरे-तेलीवाडी गैरसमजातून पती-पत्न्ाीवर कोयेतीने वार करणार्‍या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा.घडली. अमोल थोरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार,हे सर्व एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्या जमिनीवरुन वाद सुरु आहेत.दरम्यान,गुरुवारी टाळसुरे-तेलीवाडी येथील ग्रामस्थ वाडीतील रस्याच्या दुतर्फा असलेली झाडी तोडत होेते. तेव्हा अमोर थोरे याने ठेवलेल्या त्याच्या सेंट्रिंगच्या लाकडांवर वाडीतील ग्रामस्थांनी तोडलेल्या झाडांच्या फांद्या पाहून त्या फांद्या मिलिंद थोरे यानेच टाकल्याचा अमोलचा गैरसमज झाला.

या रागातूनच मिलिंद थोरे आणि त्याच्या पत्न्ाीने तयार केलेली आंबा कलम अमोल कोयतीने तोडून नुकसान करु लागला.मिलिंद थोर आणि त्यांची पत्नी अमोलला थांबवण्यासाठी गेले असता अमोलने मिलिंदच्या डोक्यात आणि त्याच्या पत्न्ाीच्या उजव्या हाताच्या बोटावर मारुन दुखापत केली.याप्रकरणी अमोल विरोधात भादंवि कायदा कलम 324,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.