नेमळेतील पाककृती स्पर्धेत राधिका राऊळ यांचे ‘नाचणीचे सूप ‘ प्रथम 

प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानांतर्गत आयोजन 

सावंतवाडी । प्रतिनिधी : प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नेमळे नं १ या शाळेतील पाककृती स्पर्धेत

सौ. राधिका बाळकृष्ण राऊळ यांनी बनविलेल्या ‘नाचणीचे सूप ‘ या पाककृतीने प्रथम क्रमांक पटकवला. या स्पर्धेमध्ये देऊळवाडी फौजदारवाडी शाळेतील पालकांसह ग्रामस्थानी सहभाग घेतला नाचणी, वरी, गहू, तांदूळ,यासारख्या विविध धान्याचा वापर करून मोदक, सूप, लाडू,करंज्या,शेवया,असे अनेक पदार्थ बनवून आकर्षक सजावटीसह मांडणी करण्यात आली होती,

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक

सौ. सुविद्या लीलाधर राऊळ तर तृतीय क्रमांक सौ. साक्षी सतीश राऊळ हिने पटकवला केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जन जागृती करण्याचे निर्देश दिले आहेत याला अनुसरूनच पालक व नागरिक यांच्या साठी तृण धान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे परीक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र नेमळेच्या

डॉ. मोनिका डीसलव्हा, आरोग्य सेविका खडपकर, मेस्त्री, वेटे यांनी केले पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक यांच्या कडून भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले यावेळी मुख्याध्यापक सौ सुनीता गावकर, शिक्षक कर्पे,

सौ. चंद्रकला भोसले, सौ श्रेया परब,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अर्जुन राऊळ उपाध्यक्ष सौ मानसी हवालदार उपस्थित होते. या पाक कला स्पर्धेतील सर्व स्पर्धकांचे शिक्षक कर्पे यांनी अभिनंदन केले.