कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्गच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेपार्य विधान केल्याबद्दल कुडाळ येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, भाजपा महिला प्रदेश सदस्य सौ प्रज्ञा ढवण, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सदस्य सौ रश्मी लुडबे, वैभववाडी नगराध्यक्षा सौ स्नेहा माईनकर, महिला सरचिटणीस सौ.रेखा काणेकर, सौ मुक्ती परब, तालुका चिटणिस सौ रेवती राणे, सौ सुप्रिया वालावलकर महिला जिल्हा पदाधिकारी तसेच जिल्हा चिटणीस श्री.बंड्या सावंत,जिल्हा कार्यकारिणीसदस्य श्री.सचिन तेंडुलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष श्री विनायक राणे, कुडाळ नगरपंचायत गटनेता श्री विलास कुडाळकर, श्री राजीव कुडाळकर, श्री निलेश परब,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री समीर प्रभूगावकर राजवीर पाटील उपस्थित होते.