सावंतवाडी विद्या सेवक पतपेढीवर सहकार समृद्धी पॅनलचे वर्चस्व

११ पैकी ८ जागा जिंकत सत्ता काबीज

सावंतवाडी : येथील विद्या सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी या पतसंस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत सहकार समृद्धी पॅनलने ११ पैकी तब्बल ८ जागा जिंकल्या व एक हाती सत्ता काबीज केली आहे.
यासाठी आरपीडी विद्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी २४५ मतदारांपैकी तब्बल २३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत सहकार समृद्धी पॅनेलला विजयी केले. सदर निवडणुकीत अगोदरच ११ पैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. यात हर्षाली खानविलकर, अनुष्का गावडे व हंबीरराव अडकुरकर हे बिनविरोध निवडून आले होते.
रविवारी संपन्न झालेल्या निवडणुकीत सहकार समृद्धी पॅनेलचे ८ पैकी तब्बल ७ उमेदवारांनी बाजी मारली यात सहकार समृद्धी पॅनेलचे पांडुरंग काकतकर, गोविंद कानसे, जयवंत पाटील, विठ्ठल सावंत, राजेश गुडेकर, शरद जाधव, प्रा. पवन वनवे यांनी विजय मिळविला . तर विद्या सेवक परिवर्तन पॅनेलचे रामचंद्र घावरे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल क्षीरसागर यांनी काम पाहिले