वेंगुर्ला : प्रतिनिधी :अभिनयासोबत, चित्रकला, गायन, वादन, रांगोळी, कविता ,मिमिक्री अशा अष्टपैलू कलागुण असलेला वेंगुर्ला तालुक्यातील हर्षल जाधव सद्या सन टीव्हीवर चालू असलेल्या क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मालिकेत “सतल्या” व्यक्तिरेखा साकारत आहे ही भूमिका विनोदी ढंगाची असल्यामुळे तो अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरला आहे.
वेंगुर्ले आनंदवाडीतील हर्षल चंद्रकांत जाधव याने ग्रॅज्युएशन केल्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये नाट्यशास्त्र विभागाची ऑडिशन दिली. संपूर्ण भारत भरातून विद्यार्थी तेथे ऑडिशन देण्यासाठी येतात. त्यातील ३०० मुलांमधून फक्त २५ जणांची निवड होते .त्यात याची निवड झाली त्याने २ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ” मास्टर इन थिएटर ही पदवी प्राप्त केली तसेच मुंबई युनिव्हर्सिटी मधील लोककला विभागातून “डिप्लोमा इन फोक आर्ट्स” ही पदविका प्राप्त केली आहे. येथे शिकत असताना त्याला अनेक हिंदी आणि मराठी सिने – नाटक क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शकासोबत नाटकात काम करायची संधी देखील मिळाली.
विजय केंकरे दिग्दर्शक: विठो- रखुमाई या नाटकात प्रमुख भूमिका, डॉ.मंगेश बनसोड दिगदर्शीत निशाणी डावा अंगठा, सलीम आरिफ दिगदर्शीत विरासत, विजयी मस्के दिग्दर्शीत- किरवंत, सौ .हिमानी शिवपुरी दिगदर्शीत- मित्रो माराजानी, मंगेश सातपुते दिग्दर्शीत – जे जे होईल, ते ते पाहावे या नाटकातून भुमिका केल्या. तसेच ” प्रा.वाल्मिकी रामायण ” हे विनोदी नाटक स्वतः दिग्दर्शित केले. तर कुर्ला टू वेंगुर्ला, पिकोलो, कैरी या चित्रपटांमध्ये भुमिका केल्या.
त्याच बरोबर मूर्ती कला,चित्रकला ,गायन, वादन, रांगोळी, कविता, नेपथ्य, पोस्टर मेकिंग, मिमिक्री असे अनेक कलागुणांमध्ये पारंगत आहे.
या आधी त्याने “रात्रीस खेळ चाले , ” बाळू मामाच्या नावानं चांग भलं,” माझ्या जीवाची होतीया काहिली ” या लोकप्रिय मराठी मालिकामधून काम केले आहे. सध्या सन मराठी चाईनल वर चालू असलेल्या ” क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ” या मालिकेत “सतल्या” नावाची भूमिका साकारत आहे.
अनेक हिंदी आणि मराठी सिने – नाटक क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शकासोबत नाटकात काम करायची संधी देखील मिळाली. त्यांचे या कामगिरीबद्दल आनंदवाडी वेंगुर्ला येथील राहणारे केतन जाधव यांनी अभिनंदन केले आहे












