कार चालवणारा तरुण प्रवासातच बेशुद्ध ; कणकवली कलमठ येथील घटना
पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
कणकवली : शहरात पटवर्धन चौकाच्या दिशेने वरडवेच्या दिशेने जाणारी सिल्व्हर रंगांची इन्होव्हा कार ही कणकवली कलमठ मच्छी मार्केट जवळ साधारणपणे अर्धा तास रस्त्याच्या मधोमध उभी केली असल्याची माहिती एका युवकाने वाहतुक पोलीस विनोद चव्हाण यांना दिली. दरम्यान वाहतूक पोलीस विनोद चव्हाण त्या ठिकाणी पोहोचले असता त्या कार मध्ये एक तरुण नशेत बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्या कारची चावी काढण्यासाठी पोलीस विनोद चव्हाण यांनी प्रयत्न केला त्यावेळी त्या तरुणाने खिडकीची काच वर केली त्यात पोलिस विनोद चव्हाण यांचा हात अडकला. त्यामुळे त्या गाडीची काच सरकवली असता ती काच तुटली आणि विनोद चव्हाण यांच्या हाताला लागली. त्यानंतर ती इनोव्हा कार कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
दरम्यान पोलीस ठाण्यात आल्या नंतर देखील तो तरुण बेशुद्ध अवस्थेतच होता. त्याच्या माहितीसाठी त्याच्याजवळ असलेले त्यांचे पाकीट तपासले असता त्याच्या पाकिटात वाहन परवाना असलेले लायसन दिसून आले. त्या लायसनवर राहुल डांगी असे नाव दिसून आले. दरम्यान या प्रकरणाबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते.












