मृत व्यक्तीच्या माहितीसाठी संपर्क करा

रत्नागिरी : अनोळखी व्यक्तीला रेल्वे ॲम्बुलन्स 108 ने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6.20 च्या दरम्यान उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान 21 एप्रिल रोजी दुपारी 1.15 वाजता अनोळखी व्यक्तीला मयत घोषित करण्यात आले.
मयत व्यक्तीची उंची अंदाजे 5 फुट, रंग निमगोरा, चेहरा उभट, केस बारीक थोडे, अंगाने सडपातळ, नेसणीस निळया रंगाची जिन्स त्याच्या उजव्या पायावर ANS CREW US COMBINATION FLOTE Aternatin असे आहे. जीन्सच्या डाव्या पायावर पुढील बाजूस Landon is style power लिहलेले आहे. तसेच शर्ट गडद निळया रंगाचे फुल हाताचे शर्ट त्याचे कॉलनवर Lazor junior shirts 36 त्याच्या शर्ट च्या खिशावर Lazor असे मार्क इंग्रजी अक्षरे असलेली व काळया रंगाचे स्पोर्ट सॉक्स असे वर्णन आहे.