

ओटवणे(प्रतिनीधी) अनिल सरमळ कर लिखीत its already tomorrow या इंग्रजी नाटकाचे प्रकाशन २२ तारीख ला मुम्बई येथे होणार असून अनिल सरमळकर यांच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे .अनिल यांच्या लेखनाचे कौतुक करताना मार्क जॉन्सन म्हणाले
“अनिलचे लेखन नोबेल प्राईझ च्या दिशेने चालले आहे कोकणचे सुपुत्र कवी लेखक नाटककार दिग्दर्शक डॉ. अनिल सरमळकर यांचे ‘द फॉक्स ‘ हे इंग्रजी नाटक दोन वर्षेपूर्वी Matchword या इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या वतीने प्रकाशीत झाले आहे.
सदर नाटक आंतरराष्ट्रीय रंगभूमी व साहित्य वर्तुळात प्रचंड गाजलेले व गौरविलेले यशस्वी नाटक असुन अनिल सरमळकर लिखित Its Already Tomorrow ‘ हे आगळेवेगळे दुसरे नाटक पुस्तक रुपाने दिनांक २२ रोजी मुंबई येथे
Horizon Books प्रकाशनाच्या वतीने प्रकाशीत होत आहे.
Its Already Tommorrow ‘ हे नाटक प्रकाशन पूर्वी रंगभूमी साहित्य व विद्यापीठ क्षेत्रातील विवीध नामवंत मान्यवर यांच्यापर्यंत पोहोचले असुन त्यावर अत्यंत सकारात्मक अभिप्राय प्राप्त झाले आहेत.
ज्येष्ठ मान्यवरांबरोबरच अमेरिकेतील कोलंबिया, येल, प्रिन्स्टन, कॉर्नेल या जगविख्यात विद्यापीठांच्या नाट्य व साहित्य विभागात हे नाटक पोहचले आहे.
द फॉक्स ‘ प्रमाणेच याही नाटकाला जगभरातून प्रतिसाद आणि मान्यवर रंगकर्मी विचारवंत लेखक नाटककार इत्यादी कडुन मान्यता मिळत असुन ‘ द फॉक्स ‘ च्याही पलिकडे हे नाटक जागतिक रंगभूमीवर आपल्या वेगळेपणाने वादळ निर्माण करेल व मान्यता मिळवेल असे सकारात्मक अभिप्राय या नाटकाबद्दल प्राप्त होत आहेत.
अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या येल युनिव्हर्सिटीतील नाट्य विभाग प्रमुख व ज्येष्ठ इंग्रजी साहित्याचे प्रोफेसर ‘ मार्क रॉबिन्सन ‘ यांनी अनिल सरमळकर यांचे ‘ द फॉक्स ‘ तसेच ‘इट्स ऑलरेडी टुमारो ‘ हे नाटक वाचले व त्यावर अभिप्राय देताना ते म्हणाले ” अमेरिकन रंगभूमीवरही इतके ॲब्सर्ड प्रायोगिक आणि साहित्य व तत्वज्ञान दृष्ट्या धाडसी नाटक आज कुणी लिहित नाही आहे . अनिल यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे,तिसऱ्या जगातून तसेच शोषित वर्गातून येणारा हा तरूण इंग्रजी नाटककार आजच्या आणि उद्याच्या काळाचे जे भयकारक भाष्य करत आहे ते अत्यंत व्यापक आणि उच्च दर्जाच्या लेखनाचे लक्षण आहे.. मला तरी वाटते,अतिशयोक्ती नव्हे परंतु हे खरेच आहे की अनिल सरमळकर या तरूण भारतीय लेखकाचे लेखन ‘ नोबेल प्राईज ‘ च्या दिशेने चालले आहे “
The Fox या आता जागतिक रंगभूमी व साहित्यात आपले नाव कोरलेल्या यशस्वी नाटकानंतर अनिल सरमळकर यांच्या Its Already Tomorrow ‘ या नाटकाची उत्सुकता नाट्य साहित्य व बुद्धीमंत वर्तुळात लागलेली आहे.
” Its Already Tomorrow ” हे नाटक The fox च्या नियोजित trilogy चा एक भाग आहे तरीही ते संपूर्ण स्वतंत्र व वेगळे नाटक असुन gibberish पध्दतीचे absurd theater शैलीतील आहे.
या नाटकात येउ घातलेल्या मानवी अराजकाचे भयकारक प्रत्यंतर मांडताना विश्वकविता महाकाव्ये तत्वज्ञान साहित्य इत्यादींतील आधुनिक आणि उत्तर- आधुनिक कित्येक संदर्भ देण्यात आले आहेत. हे नाटक अधिक ॲब्सर्ड आणि अधिक आव्हानात्मक आहे ” असे नाटककार अनिल सरमळकर म्हणाले.
दरम्यान Its Already Tomorrow या नाटकाचे पुस्तक दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई येथे Horizon Books प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होत आहे.











