विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प यावर्षी भिंगलोळीत….

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा निवासी श्रमसंस्कार शिबीर यावर्षी ग्रामपंचायत भिंगलोळी ता. मंडणगड येथे दि. ४ जानेवारी ते १० जानेवारी या दरम्यान होणार आहे. या शिबिराचे उदघाटन मा. श्री विजय सूर्यवंशी (तहसीलदार मंडणगड), मा. श्री दत्तात्रय बेर्डे नायब तहसीलदार मंडणगड, मा. श्री.विशाल जाधव (गट विकास अधिकारी) यांच्या हस्ते आणि डॉ. अंशुमन मगर (समन्वयक) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी श्री. विनोद डवले (मुख्य कार्यकारी अधिकारी मंडणगड नगरपंचायत) सौ. शैलजा सावंत (पोलीस निरीक्षक मंडणगड), ॲड. सोनल सचिन बेर्डे (नगराध्यक्षा), वैभव कोकाटे (उपनगराध्यक्ष), सौ. विजया उमेश दरवडा (सरपंच) श्री. संदीप धोंडू कदम (उपसरपंच), अलीमिया याकुब सय्यद (तलाठी) श्री संतोष हुमणे ग्रामसेवक, डॉ. भरतकुमार सोलापुरे (माजी समन्वयक) डॉ. अशोक साळुंखे (माजी समन्वयक) श्री. सुदर्शन सकपाळ (रा.से.यो. सल्लागार) श्री. नरेश सकपाळ (ग्रामस्थ) आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य भिंगलोळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर या श्रमसंस्कार शिबिराबद्दल माहिती देताना सांगितले की, या कॅम्पची संपूर्ण पूर्व तयारी झाली असून या शिबिरात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक विधायक उपक्रम हाती घेणार आहेत यामध्ये रस्ते दुरुस्ती, ग्रामस्वच्छता, जलसाक्षरता, वनराई बंधारा, व्यक्तिमत्व विकास, समाजप्रबोधन, सार्वजनिक आरोग्य जागृती, महिला सक्षमीकरण, आपत्कालीन व्यवस्थापन, जलसंधारण, स्वच्छता प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मुलन यांचा समावेश आहे.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी सहा. प्रा. अमोल राजेशिर्के म्हणाले की, या निवासी शिबिरादरम्यान विविध विषयावर व्याख्यान व चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने “लोकशाहीतून लोकप्रबोधन” या विषयावर शाहीर शाहीद आदम खेरटकर, “सोलूशन थिंकिंग” या विषयवार श्री. वरूण महाजन, “कोकणातील गडकिल्ले” या विषयावर प्रा. प्रभाकर भालके, “इफेक्टीव्ह पब्लिक स्पिकिंग” या विषयावर श्री कुणाल मंडलिक यांचे व्याख्यान तर “ग्रामीण पत्रकारिता” या विषयावर मंडणगड पत्रकार संघ यांच्या माध्यमातून चर्चासत्राचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण रुग्णालय मंडणगड यांच्यातर्फे आरोग्य तपासणी आणि विद्यार्थ्यांशी सुसंवाद हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे.