रासाई देवी यात्रोत्सव निमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर

Google search engine
Google search engine

आचिर्णेत दि. 6 रोजी कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी | प्रतिनिधी : आचिर्णे येथे रासाई देवी जत्रोत्सवानिमित्त रक्तदान, नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रासाई देवी मंदिराच्या पटांगणावर दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, एस. एस. पी. एम. हॉस्पिटल पडवे आणि आर्यन ऑप्टिशियन वैभववाडी यांच्या सहयोगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आचिर्णे गावातील व परिसरातील रुग्ण व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी विजय रावराणे 7977324994, शेखर रावराणे 8669082426, सुशील रावराणे 9075932106, संतोष रावराणे 9579617419, स्वप्नील दर्डे 8308584623 यांच्याशी संपर्क साधावा.