शहीद सुनिल सावंत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार 

शनिवारी सकाळी ११.४५ वाजता पार्थिव कारिवडेत आणणार  

सावंतवाडी । प्रतिनिधी : पंजाब येथे शहीद झालेले १९ मराठा बटालियनचे सुभेदार सुनिल राघोबा सावंत यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ११:४५ च्या सुमारास कारीवडे गावात आणण्यात येणार आहे. याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कारिवडे गावातून तात्या सावंत आणि प्रमोद राऊळ हे दिल्ली येथे रवाना झाले आहेत. शहीद सुनिल सावंत यांचे पार्थिव पंजाब येथून दिल्ली विमानतळावर आणण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी ७:५५ मिनिटांनी दिल्ली विमानतळावरून इंडिगो कंपनीच्या विमानातून त्यांचे पार्थिव अडीच तासांच्या प्रवासानंतर सकाळी १०:२५ वाजता गोवा मोपा विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव कारिवडे गावात आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.