सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
मसुरे | झुंजार पेडणेकर
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण व कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना अर्थात UNDP-GCF अंतर्गत शेतकरी अभ्यास दौरा औरंगाबाद सिल्लोड येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण येथून निघून 2 जानेवारी ते 5 जानेवारी असा चार दिवसाचा भेट कार्यक्रम आहे. यामध्ये औरंगाबाद सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पाहणे, राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध उपक्रमांची पाहणी व माहिती घेणे. प्रगत शेतकरी यांना भेटी, सुधारित तंत्रज्ञानाची माहिती घेणे, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये बहुसंख्येने विविध प्रकारचे स्टॉल उभारणी, विविध प्रकारची प्रात्यक्षिके,आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग,शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच विविध विषयावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा ह्या उद्देशाने शेतकरी अभ्यास दौरा आयोजन करण्यात आलेला आहे. यामध्ये तालुकास्तरावरून तालुक्यातील 45 शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी कार्यालय मालवण यांच्या वतीने असुन UNDP-GCF यांच्या अर्थसाहयाने आयोजित आहे. दौऱ्यामध्ये बदनापूर कडधान्य संशोधन केंद्र येथील विविध उपक्रमांची माहिती घेतली जाणार आहे. परतीच्या प्रवासात कोल्हापूर कनेरी मठ येथील सेंद्रिय शेतीचे उपक्रमाची माहिती घेणे.अशा विविध उपक्रमांची माहिती शेतक-यांना सदरील दौ-यात होणार आहे.तरी इतर शेतकरी यांनी राज्य स्तरीय कृषि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत कळविण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी श्री विश्वनाथ गोसावी यांनी श्रीफळ फोडून शुभारंभ केला, यावेळी कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते.