चाकरमान्यांचे गुलाब पुष्प देऊन रत्नागिरीत झाले स्वागत

रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई-गोवा महामार्गावर स्थापन करण्यात आलेल्या चिपळूण कळंबस्ते येथील मदत केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला. तसेच गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत करुन त्यांची विचारपूस केली.