ओटवणे(प्रतिनीधी) सरमळे देऊळवाडी येथील रमाकांत शिवराम परब (वय ५०) यांचा घरातच विजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. सध्या गणेश चतुर्थी ची तयारीची लगबग सुरू असल्याने घरातील विद्युत कनेक्शन ची दुरुस्ती करत असताना ही दुर्दैवी घटना घडली .वीजेचा जोरदार झटका लागल्यानंतर त्यांना त्वरीत दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांना मृत घोषित केले. रमाकांत परब हे मुंबई गोवा खाजगी बसमध्ये क्लिनर म्हणून कामाला होते.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी दवाखान्यात धाव घेतली.त्यांच्या अकाली मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पच्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.












