कलर बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये सेंट ॲन विद्यानिकेतन देवधे लांजा या प्रशालेतील तायक्वांदो खेळाडूंचे सुयश

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील देवधे येथील सेंट ॲन.विद्यानिकेतन प्रशाला येथे पार पडलेल्या कलर बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये सेंट ॲन.विद्यानिकेतनच्या तायक्वांदो खेळाडूंनी सुयश संपादन केले.

तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा व सेंट.ॲन.विद्यानिकेतन तायक्वॉंदो प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य संघटना खजिनदार व्यंकटेश राव करृरा यांच्या मार्गदरशनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी लांजा तालुक्यातील नॅशनल खेळाडू, नॅशनल पंच, नॅशनल कोच व महिला प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर, पाचल येथील प्रशिक्षक युवराज मोरे, पालक प्रतिनिधी व उद्योजक सचिन यादव उपस्थित होते.

तसेच या परीक्षेमध्ये सहभागी खेळाडू पुढील प्रमाने येल्लो बेल्ट करिता १४, ग्रीन बेल्ट ९, ग्रीनवन बेल्ट ,ब्लू बेल्ट-१ अशा प्रकारे सहभाग नोंदवला या मध्ये यल्लो बेल्ट – गौरव रामचंद्र झोरे, विधी स्वरूप सरफरे, कपिल प्रशांत खांडे, अद्वैत कमलेश सावंत, राज सचिन यादव, हसन शादाब नाईक, आयुष्या सचिन देसाई, हर्षित विनेश शारदल,आशय सागर राऊळ, ऋग्वेद प्रदीप बेकरे, वसुधा समीर जाधव, निकिता राम खडके,दिव्यांक दिग्विजय लवाते, हर्षवर्धन विश्वजीत कांबळे,ग्रिन बेल्ट – श्लोक संदीप खेडेकर, शुभम धर्मेंद्र पटेल,पुरुराज

महेश चव्हाण, वरद वैभव जठार, आयेशा शादाब नाईक, ऋदवेद

प्रमोद कदम, मानसी प्रमोद कदम, अजलान इक्बाल कासू, संचित सुदीप पुरत,ग्रिन१बेल्ट – लक्ष नरेश भगत, ब्लू बेल्ट -अर्णव संतोष नामे, या सर्व मुलांनी लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.

या परीक्षाकरीता परीक्षक म्हणून मुकेश शांताराम नाचरे यांनी काम पाहिले.तसेच सर्व मुलांना व प्रशिक्षकांना लांजा तालुका तायक्वॉंदो अकॅडमी चे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्क्ष अमोल रेडीज, सचिव तेजस्विनी आचरेकर ,सह सचिव अनुजा कांबळे, कोषाध्यक्ष तेजस दत्ताराम पावसकर,सदस्य रोहीत कांबळे, सदस्य शितल आचरेकर, सेंट.ॲन विद्यानिकेतन च्या मुख्याध्यापिका सिस्टर बिना जोसेफ,क्रीडा शिक्षक सविता जगदाळे व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन चे अध्यक्ष व्यंकटेशराव करृरा , सचिव लक्ष्मण करृरा , कोशाध्यक्ष शशांक घडशी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.