पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त लिपिक दत्तात्रय तथा मामा बर्वे यांचे निधन

रत्नागिरी : चिपळूण पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक दत्तात्रय उर्फ मामा बर्वे (वय ७८) यांचे रत्नागिरीमध्ये १८ सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर चर्मालय येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

मामा बर्वे १९६३ मध्ये कोयना प्रकल्पात कोयनानगर येथे टेलिफोन ऑपरेटर म्हणून सेवेत रुजू झाले. नंतर पाटबंधारे विभागात नातूवाडी आणि कापसाळ येथे वरिष्ठ लिपिक म्हणून त्यांनी सेवा केली. पाटबंधारे विभागाच्या गणेशोत्सवासह विविध सांस्कृतिक उपक्रम ते पुढाकार घेऊन करीत होते. अतिशय प्रामाणिक, शिस्तबद्ध काम करणारे मामा सुपरिचित होते. साहित्याची वाचन, कविता, कथाकथन आणि अभिनय हे त्यांच्या आवडीचे विषय होते. चिपळुणमध्ये आयोजित प्रत्येक उपक्रमात ते सहभाग घेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी नंदा, मुलगा प्रा. राहुल, मुलगी रिता आणि जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.