रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील जॅक वेल कोसळल्याने ऐन पावसाळ्यात रत्नागिरीकरांसमोर पाणी संकट उभे राहिले असतानाच एमआयडीसी रत्नागिरीकरांच्या मदतीला धावली असून दुपार पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
शीळ धरणाची जॅक वेल पहाटेच्या सुमारास कोसळली आणि रत्नागिरीकरांवर पाणी संकट उभे राहिले असताना आणि नवीन जॅक वेल चालू करण्यासाठी सुमारे १५ ते २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता असताना आता म्हणून पानवलं धरणातून व एम आय डी सी कडून पाणी घेऊन त्याचा पुरवठा शहराला केला जाणार आहे.











