रत्नागिरी शहरासाठी पुढील २ दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता
रत्नागिरी : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील जॅक वेल कोसळली आहे. सुदैवाने ही जॅक वेल कोसळताना कामगारांनी बाहेर उड्या टाकल्याने ते बचावले आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही ऐन पावसाळ्यात रत्नागिरीकरांसमोर पाणी संकट उभे राहिले आहे.
नवीन जॅक वेल चालू करण्यासाठी सुमारे १५ ते २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून पानवलं धरणातून व एम आय डी सी कडून पाणी घेऊन त्याचा पुरवठा शहराला केला जाणार आहे. उद्या दुपारपर्यंत शहराला पाणी देण्याचे प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी तुशार बाबर यांनी सांगितले आहे. आज पहाटे जॅक वेल कोसळतच माजी नगरसेवक निमेश नायर आणी नगर पालिका अधिकारी आणी कर्मचाऱ्यांनी शिळ धरणाकडे धाव घेतली.
सध्या नवी जॅक वेल बांधून पूर्ण झाली आहे. ही नवी जॅक वेल जरी जलद गतीने सुरु करायची म्हटली तरी १५ ते २० दिवसांचा अवधी लागू शकतो. असे सांगण्यात येतं आहे













