रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मानले आभार
मंडणगड | प्रतिनिधी : कुडुकखुर्द बौध्दवाडी येथील वयोवृध्द नागरीक, महिला व सर्वच नागरिकांना पाण्यापासून वंचीत ठेवून वाडीतील नागरीकांची जाणीवपुर्वक गैरसोय करणाऱ्या ग्रामपंचायत सर्व संबंधीतांचे विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) व कुडुकखुर्द बौध्दवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने 2 जानेवारी 2023 रोजी तहिसलदार मंडणगड यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकरिता समस्येचे निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनाची दखल मंडणगडचे तहसिलदार विजय सुर्यवंशी यांनी तातडीने घेतली व या संदर्भातील सर्व संबंधीतांची तातडीने सभा घेऊन योग्य त्या सुचना देवून पिण्याचे व नैमीत्तीक वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची पर्याय व्यवस्था उपलब्ध करुन दिली त्यामुळे ग्रामस्थांची समस्या मार्गी लागली. प्रशासनाने ग्रामस्थांचे समस्येची दखल घेतल्याने ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी आज तहसिलदारांची भेट घेऊन आभार पत्र देत त्यांचे अभिनंदन केले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे तालुका अध्यक्ष राजेश साळवी, माजी तालुका अध्यक्ष राजेश गमरे, युवा कार्यकर्ता राजेश खैरे, महेश मर्चंडे, सुनील मोरे, सौरभ खैरे ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.