रविवारी कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखेची विशेष सर्वसाधारण सभा

राजापूर (वार्ताहर): कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा राजापूर ग्रामीण समिती या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामीण शाखाध्यक्ष दीपक बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संघ निरीक्षक संघ चिटणीस अरविंद डाफळे, संघकार्यकारिणी सदस्य, शाखेचे मुंबई पदाधिकारी यांच्या उपस्थीतीत राजापूर हायस्कुल कलामंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत सन २०२३ ते २०२८ या कालावधीकरिता ग्रामीण कार्यकारिणीची निवड करणे तसेच आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

तरी या सभेला सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सभासद यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन ग्रामीण समिती सचिव सौ. मानसी दिवटे यांनी केले आहे.