भाजपाच्या राजापूर पुर्व मंडळ तालुका अध्यक्षपदी भास्कर सुतार यांची निवड

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्याच्या पुर्व मंडळ तालुका अध्यक्षपदी भाजपाकडून माजी पंचायत समित सदस्य व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

राजापूर तालुका विस्ताराने मोठा असल्याने आता पुर्व व पश्चिम अशा दोन मंडळांना दोन स्वतंत्र तालुका अध्यक्ष काम करणार आहेत. पुर्व भागातील पाचल, ओणी व केळवली जिल्हापरिषद गटासाठी भास्कर सुतार यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

तर पश्चिम मंडळात राजापूर शहरासह कोदवली, देवाचेगोठणे व सागवे या विभागांचा समावेश असून या मंडळाच्या तालुका अध्यक्षांची घोषणाही लवकरच केली जाणार आहे.

भास्कर सुतार यांची पर्व मंडळ तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.