रत्नागिरी :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ. 5 वी व 8 वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व जानेवारी /फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे, असे विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ यांनी कळविले आहे.*
ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरणे. 18 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे. 11 ऑक्टोबर 2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे.
वरील नमुद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ.5 वी व 8 वी साठी प्रविष्ठ होणऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा.












