भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंत याच्यावर पुढील उपचार मुंबईत केले जाणार आहेत. ३० डिसेंबरला रिषभ कार अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्यावर देहराडून येथे उपचार सुरू होते. रुरकीजवळ कार अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. डेहराडूनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र BCCI व दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मोठा निर्णय घेतला आहे. BCCI व DDCA पंतला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार आहे. त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर उपचार केले जातील. रिषभला मॅक्स हॉस्पिटलमधून बाहेर आणतानाची दृश्य हाती आली आहेत. यामध्ये रिषभला स्ट्रेचरवरून अॅम्बुलन्समध्ये ठेवल्याचे दिसत आहे. पण, मीडियाने प्रचंड घोळका केल्याने रिषभचे नातेवाईक भडकलेले दिसत आहेत.
Home ताज्या घडामोडी Breaking: रिषभ पंतवर अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार, एअर अॅम्बुलन्सने मुंबईसाठी रवाना