लांजा (प्रतिनिधी) लांजा शहरा नजीकच्या कुवे गावचे रहिवासी इकबाल गिरकर यांची भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
कुवे गावचे रहिवासी असलेले इकबाल गिरकर हे गेले अनेक वर्षे भाजपा पक्षाचे सक्रिय आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षे पक्षाच्या विविध आंदोलने, मोर्चामध्ये ते सक्रिय सहभागी होते. त्यांच्या या एकूणच कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
दरम्यान संपूर्ण रत्नागिरी जिल्हा भाजपाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी इकबाल गिरकर यांची अल्पसंख्यांक मोर्चाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी इकबाल गिरकर यांची निवड जाहीर केली आहे .या निवडीचे पत्र इकबाल गिरकर यांना देण्यात आले असून पक्षाने आपल्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही बाब लक्षात घेऊन संपूर्ण दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात अल्पसंख्यांक सेल या पदाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा आपला मानस असून यासाठी तालुका, जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण काम करणारा आहे. आगामी काळात पक्ष संघटना वाढीवर भर देणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष इकबाल गिरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, अल्पसंख्यांक मोर्चाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इकबाल गिरकर यांच्यावर तालुक्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












