विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणी प्रवाशांचा सुरू आहे जीवघेणा प्रवास

संतोष कोत्रे l लांजा : तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणी मुंबईकर चाकरमान्यांचा रेल्वे पकडण्यासाठी जीवघेणा प्रवास सध्या सुरू आहे. मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या या प्लॅटफॉर्म नंबर दोन वर थांबत असल्याने रेल्वे पटरी क्रॉस करावी लागत आहे. मात्र या ठिकाणी प्रवाशांना उतरण्यासाठी ब्रिज किंवा चांगल्या प्रकारची पायरी नसल्याने लाकडी शिडीचा उपयोग केला जात आहे आणि तो अतिशय जीवावर बेतणारा आहे.

विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर दोन वर काही गाड्या (मुंबईकडे जाणाऱ्या) थांबत आहेत आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या गाड्या पकडण्यासाठी सध्या जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कारण प्लॅटफॉर्म नंबर दोन वर जायला रेल पटरी क्रॉस करावी लागत आहे . या ठिकाणी कोणती ब्रिज किंवा चांगल्या प्रकारची पायरी उतरुन जायला नाही. एका लाकडी शिडीचा उपयोग या ठिकाणी केला जात आहे. मात्र ती अतिशय धोकादायक असून लाकडी शिडीचा उपयोग हा धोकादायक आणि असुरक्षित आहे. विशेषतः जेष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे .मात्र तरी देखील रेल्वे प्रवाशांच्या या गैरसोयीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होते की काय असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.