दापोली(प्रतिनिधी) कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी कुलगुरु महोदय डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग ठाणे अंकुश माने यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्रगतशिल शेतकरी, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत विद्यापीठाच्या विद्या परिषद दालनामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये शेतकऱ्यांना आंबा पिकाच्या फुलकिडी, फळमाशी नियंत्रणासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.शेतकऱ्यांच्यावतीने प्रसन्न पेठे, उमंग साळवी, विनायक महाजन, उदय जोशी यांनी विविध समस्यांवर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विभाग प्रमुख व सहयोगी अधिष्ठाता, डॉ. पराग हळदणकर, किटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विनायक जालगांवकर, अंकुश माने यांनी सादरीकरण केले.











